* भगुरला शिवसेना विभाग प्रमुखाचा भाजपात प्रवेश , देवळाली कॅम्प ( प्रतिनिधी ) :- भारतीय जनता पार्टिचे प्रदेश प्रवकते लक्ष्मण सावजी यांच्या उपस्थित शिवसेनचे प्रभाग क्र. पाचचे माजी विभाग प्रमुख सोमनाथ बाळासाहेब देशमुख यांनी भाजपात प्रवेश करुन शिवसेनेला सोडचिट्ठी दिली आहे. सावरकर वाडयात झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी भगूर येथील शिवसेनेचे प्रभाग क्र. पाचचे विभाग प्रमुख सोमनाथ बाळासाहेब देशमुख हे मागील पंच वार्षिक मध्ये शिवसेने कडून निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. त्यावेळी शिवसेने कडून तसा शब्दही दिला होता. मात्र वेळेवर शब्द फिरविला. त्यामुळे मला सेनेत काम करण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी भाजपात प्रवेश केला. असे देशमुख यांनी सांगितले. प्रवेश सोहळा प्रसंगी सावजी यांनी देशमुख यांचे भाजपात स्वागत केले. यावेळी भाजपा नाशिक महानगर प्रमुख सचिन घुगे, युवा मोर्चा नाशिक महानगर प्रमुख मनीष बागुल, भगूर शहराध्यक्ष तथा नाशिक महानगर सचिव शेखर कस्तूरे, भगूर- देवलाली मंडल अधक्ष कैलास गायकवाड़, शहराध्यक्ष प्रसाद आडके शाहराध्यक्ष जीवन गायकवाड, प्रताप गायकवाड़, डॉ. मृत्युंजय कापसे, विलास कुलकर्णी, अमोल इगे, सुनील जाधव, अनाजी कापसे, नीलेश हासे, मधुकर कापसे, दिलीप कातकाडे, संदीप शेळके आदि उपस्थित होते.