ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पत्रकार , छायाचित्रकार यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करून लसीकरणाला प्राधान दया :- आमदार सुधीरदादा गाडगीळ


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/13/2021 6:37:39 PM

     
      सांगली जिल्ह्यातील प्रसिध्दी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करुन लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

उपरोक्त विषयान्वये राज्यातील व जिल्ह्यातील वृत्तपत्रे, पत्रकार, विविध प्रसिध्दी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन रस्त्यावर येउन स्वतःचा जीव धोक्यात घालुन वृत्तांकन करीत असतात. आणि लोकांपर्यंत पोहचवित असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. कोरोनाच्या काळात पत्रकार बंधु समोर येउन कार्य करीत असताना अनेक पत्रकार कोरोना बाधीत झाले आहे. काही जणांना आपला प्राण सुध्दा गमावावा लागलेला आहे.

देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिध्दी आणि दृकश्राव्य माध्यमातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणुन जाहीर करण्यात आले आहे. दुर्देवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अदयापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतुन सांकेतिक आंदोलन सुध्दा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो, तर दुसऱ्या लाटेत सुध्दा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपुसकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल.

या कोरोना साथीच्या काळात रुग्णालयात जाउन, स्मशानभुमीत जाउन जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्यांशी थेट संवाद साधुन हे पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जनजागरण करण्यात सुध्दा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम करता येत नाही, अगदी तसेच अवस्था पत्रकारांची सुध्दा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाउनच काम करावे लागते, त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करावे व आपणाकडुन जिल्हाधिकारी यांना आदेश व्हावे ही विनंती.

Share

Other News