ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय कौतुकास्पद आणि दिलासा देणारा - प्रकाश कुलथे


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 5/13/2021 9:49:19 PM

- लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये देण्याचा लोकमत व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय दिलासा देणारा आहे.राज्यातील अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्येष्ठ व नवोदित पत्रकार भीतीच्या छायेत काम करत आहेत. जोखीम पत्करून  पत्रकार फिल्डवर काम करत आहेत, त्यातील अनेकांना त्यांच्या कंपन्यांचे कोणतेही सुरक्षा कवच नाही. त्यामुळे दुर्दैवाने जर काही अनुचित प्रकार घडला तर पत्रकारांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते.
अशा वेळी लोकमत समूहाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे पत्रकारांना निश्चितच काम करण्यास अधिक बळ मिळेल. वृत्तपत्र अडचणीच्या काळात आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही ही भावना सकारात्मक परिणाम घडवून आणणारी आहे.
कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे जाहिरात व्यवसाय आटलेला आहे. अनेक आव्हानांना वृत्तपत्रांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी लोकमतने आपल्या दिवंगत पत्रकारांना 10 लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे.  लोकमतचे मनापासून अभिनंदन /आभार .

Share

Other News