ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

बिलोलीत मंगेश कदम समर्थकांचे शक्तिप्रदर्शन कदम यांना उमेदवारी देण्याची केली मागणी.


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 6/14/2021 8:40:21 PM

नांदेड:राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे बिलोली तालुक्यात आले असता. देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांच्या समर्थकांनी कदम यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सर्वधर्मीय निवेदनाद्वारे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.
 नांदेड पंचायत समितीचे माजी सदस्य तथा मनपा नगरसेवक प्रतिनिधी मंगेश कदम हे राखीव असलेल्या देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यांचे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण बिलोली येथे झाले असून त्यांच्या वडिलांनी बिलोली तहसील कार्यालया अंतर्गत सोळा वर्ष सेवा बजावली असल्याने त्यांचे तालुक्यातील ग्रामीण भागात जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
 व मंगेश कदम यांची बिलोली तालुक्यातील सर्व धर्मियांशी नाळ जुळलेली असल्याने त्यांचे  बालमित्र, वर्गमित्र, हितचिंतक,मित्रमंडळीनी त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली असून   कदम यांचे  सामाजिक कार्य  व राजकीय अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी  बिलोली व कुंडलवाडी शहरातील नागरिकांसह लोहगाव,सावळी, रुद्रापूर, अर्जापूर कार्ला,माचनुर, सगरोळी येथील मित्रमंडळीनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Share

Other News