*'हे’ पदार्थ कच्चेच खा*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/08/2021 5:46 PM

      ⭕तुमच्या शरीराला मिळतील सर्वाधिक फायदे.......
 
आपलं अन्न हे व्यवस्थित शिजवलेलंच असलं पाहिजे हे अगदी योग्य आहे. 
परंतु, आपल्या आहारात असेही काही पदार्थ असतात जे कच्चे खाणंच शरीरासाठी अधिक पोषक असतं. 
कच्चा अन्न आहार ही खरंतर शाकाहारामधीलच एक संकल्पना आहे. 
ह्यात मुख्यतः विविध फळं, भाज्या, ड्राय फ्रुट्स, कडधान्य यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. 
मुख्य म्हणजे हे अन्नपदार्थ कच्चे असल्याने त्यात तेलाचा समावेश बिलकुल नसतो. 
त्यामुळे अर्थात कॅलरीज देखील कमी असतात. 
शिवाय या विशिष्ट पदार्थांमध्ये अनेक पौष्टिक घटक तर असतातच. 
एक लक्षात घ्यायला हवं कि, आपल्या आहारात असलेल्या काही अन्नपदार्थांना अधिक उष्णता मिळाली कि त्यांतील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्सची संख्या कमी होते.
 
⭕दरम्यानआज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत .......

जे जे कच्चे खाल्ल्याने आपल्या शरीराला अधिक पोषक घटक मिळतात.
 कांदा भारतीय घरांमध्ये 
सर्वात जास्त वापरली जाणारी एक भाजी म्हणजे कांदा. 
जवळपास आपल्याकडे बनणाऱ्या सगळ्या डाळी, भाज्या, उसळी आणि कालवणांमध्ये कांदा हमखास वापरला जातो.
 पण सॅलडच्या माध्यमातून कच्चा कांदा खाणं आपल्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. 
कांद्यामध्ये असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या यकृतासाठी उत्तम असतात. 
अॅलिसिन नावाच्या संयुगामुळे कांद्याला एक वेगळाच सुगंध देखील असतो. 
कच्चा खाल्ल्याने कांद्यातील अॅलिसिन हे हृदयरोग रोखण्यास, हाडांची घनता वाढवण्यास आणि रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं.

  बीट ही एक लोहाने परिपूर्ण अशी भाजी आहे. 
विशेषतः सॅलड आणि ज्यूसच्या स्वरूपात तिचं सेवन केलं जातं. 
बीट कच्च खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या