ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

बामणोली, कुपवाडचे सुपुत्र प्रशांत बामणे सर राज्यस्तरीय " प्रतिष्ठा" पुरस्काराने सन्मानित...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/26/2021 11:12:46 AM


       प्रतिष्ठा फौंडेशनचे ५ वे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा आज तासगाव येथील समृद्धी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. संमेलनाध्यक्ष साखर आयुक्त शेखर गायकवाड, स्वागताध्यक्ष काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विशालदादा पाटील, खासदार संजयकाका पाटील, उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, खासदार संजयकाका पाटील, अभियंता लालासाहेब मोरे, सुहास सुर्यवंशी, कविसंमेलन अध्यक्ष रमजान मुल्ला, कथाकार अर्चना लाड यांच्या सह साहित्यिक सहभागी झाले. 
      हया भव्य दिव्य कार्यक्रमांत बामणोलीचे सुपुत्र भैरवनाथ स्पोर्टसचे प्रशिक्षक मा. प्रशांत बामणे सर यांना " प्रतिष्ठा पुरस्कार " देऊन गौरयान्वित करण्यात आले. बामणे सरांचा हा तब्बल ८ वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.  अनेक खेळाडू , पोलिस  व भारतीय सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्याना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या कामाचा यथोचित सन्मान या पुरस्काराने झाले आहे. त्यांना या मिळालेल्या विशेष पुरस्काराबदद्ल समाजाच्या सर्व थरांतुन कौतुक होत आहे.

Share

Other News