ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विजया चतुर लिलके यांना पत्रकार संघाचा स्वयंसिद्ध पुरस्कार प्रदान 


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 9/27/2021 9:01:24 PM

विजया चतुर लिलके यांना पत्रकार संघाचा स्वयंसिद्ध पुरस्कार प्रदान 

 अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने कतृत्वान महिलांच्या सन्मानार्थ स्वयंसिद्ध पुरस्कार प्राथमिक विद्यामंदिर भगूर येथील शाळेच्या विजया चतुर लिलके याना 25 सप्टेंबर रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे सिने अभिनेता चिन्मय उदगिरकर मिस ग्लोबल संगीत खैरनार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला श्रीमती विजया चतुर लिलके या भगूर येथे 22 वर्षापासून ज्ञान दानाचे कार्य अतिशय उत्साहाने करत आहेत अत्यंत कार्यकुशल आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक ,साहित्यिक बाल स्नेही उपक्रमात नेहमीच अग्रेसर अशी त्यांची ओळख आहे , हैद्राबाद येथे झालेल्या 5 व्या राज्यस्तरीय कॉन्फरन्स मध्ये त्यांचा विशेष सहभाग होता , कोविड काळात ऑनलाइन व ऑफलाईन ज्ञानदानाची ज्योत तेवत ठेवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे , त्याचबरोबर परिसरातील अपंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन , वैद्यकीय मदत व उपचार मिळवुन देण्यात त्यांचा विशेष सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना , आदर्श शिक्षक , कवयित्री ' साहित्यिक , आदर्श माता महिला पुरस्कार , नारी शक्ती पुरस्कार , साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांद्वारे गौरविण्यात आले आहे

Share

Other News