युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या पुढाकारातून कृष्णा नदी स्वच्छता अभियानाचा भव्य शुभारंभ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/04/2026 6:51 PM

सांगलीची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी युवराज #आदित्यराजे पटवर्धन यांच्या पुढाकारातून आज सकाळी सरकारी घाटावर कृष्णमाईची आरती करून भव्य स्वच्छता अभियानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाला सांगलीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
सांगलीच्या पर्यावरण रक्षणासाठी आणि #कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच पुढील काळात एक व्यापक लोकचळवळ ठरणार असल्याचे चित्र आजच्या उत्स्फूर्त सहभागातून स्पष्ट झाले.आता पुढचा रविवार विष्णुघाटावर #स्वच्छता !

Share

Other News

ताज्या बातम्या