ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नारी शक्ती पुरस्कारांसाठी अर्ज आंमत्रित


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/18/2022 8:24:24 PMगडचिरोली,(जिमाका)दि.18: केंद्रीय महिला व बाल विकास विभाग, अंतर्गत महिला व बाल विकास या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/व्यक्ती यांना नारी शक्ती पूरस्कार प्रदान करण्यात येतो. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुकांना केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर जावून नारी शक्ती पुरस्कार मार्गदर्शिका नुसार त्यात आवश्यक पात्रता,नामांकन कोण सादर करु शकतील. जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, नामांकन सादर करण्याची पध्दत वयाची अट व अनुभव याचे वाचन करुन केंद्रशासनाचे www.awards.gov.in या वेबसाईटवर केवळ ऑनलाईन अर्ज/नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 पर्यंत आहे. तरी इच्छुक व्यक्ती /संस्थाकडुन केवळ ऑनलाईन अर्ज/नामनिर्देशन मागविण्यात येत आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली प्रकाश बा. भांदककर यांनी कळविले आहे.
******

Share

Other News