भगूर येथील नटराज फ्रेंड सर्कल तर्फे भव्य पाणपोई चे उद्घाटन
रामजन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर समाजसेवेचा संकल्प!
भगूर मेन रोड येथे "नटराज फ्रेंड्स सर्कल" च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाणपोईचे आज भव्य उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या स्तुत्य उपक्रमाचे हे सलग सहावे वर्ष असून, जनसेवेचा हा वारसा आम्ही समर्थपणे पुढे चालवत आहोत.
आजच्या या मंगल दिनी, परिसरातील आदरणीय महिला ज्येष्ठ नागरिक श्रीमती विमल सुरेश गणोरे व श्रीमती सुलोचना कशिनाथ मोजाड यांच्या शुभहस्ते पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन आमच्या कार्याला नेहमीच नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारे ठरते.
उद्घाटनाच्या निमित्ताने आज येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना थंडगार सरबताचे वाटप करण्यात आले. कडक उन्हात तृप्त होणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमच्या कार्याचे फलित आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
प्रवीण वाघ.संतोष मोजाड.संभाजी देशमुख.अमोल गणोरे.मोहित वाघचौरे.मनोहर आंबेकर.राहुल थोरात.महेश वाघचौरे.संतोष अहेरराव.मोहम्मद मन्सुरी.गणेश वाघचौरे.अभिजीत मानधने.नितेश लिलाणी.राजेश मानधने.प्रशांत कस्तुरे.शंभू थोरात
अंश मोजाड व सर्व मित्रपरिवार, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले नटराज फ्रेंड्स सर्कलच्या सर्व सदस्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच हा 'जलसेवा' यज्ञ शक्य झाला आहे.
~ नटराज फ्रेंड्स सर्कल, मेन रोड, भगूर
“मैत्रीतून समाजसेवेची वाट”