भगूर शहर होणार कचरामुक्त- सौ.प्रेरणा विशाल बलकवडे

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 30/03/2026 8:06 PM

भगूर शहर होणार कचरामुक्त- सौ.प्रेरणा विशाल बलकवडे
 भगूर शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षा सौ.प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या प्रयत्नातून भगूर नगरपरिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरात जमा होणारा घनकचरा वैज्ञानिक पद्धतीने भगूर घनकचरा व्यवस्थापन (SWM) प्रकल्पावर पाठवून प्रक्रिया केला जातो.भगूर शहराचे क्षेफ कमी असून जागे अभावी कचरा टाकण्यासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट व भगूर नगरपरिषद दोन्ही संस्थांमध्ये लवकरच  सामंजस्य करार (MOU) करण्यात येणार असून, यामुळे भगूर शहर पूर्णपणे 'कचरामुक्त' होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी  नगरपरिषदेने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे त्यांचा प्रकल्प वापरण्याची विनंती केली होती. या विनंतीला बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद देत २७-०२-२०२६ रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. 
शहराचा चेहरामोहरा बदलणार या निर्णयामुळे शहरातील कचरा डेपोची समस्या संपणार असून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लागणार आहे. यामुळे शहरात पसरणारी दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्न कायमचे मिटतील. नगराध्यक्ष सौ.प्रेरणा विशाल बलकवडे  यांच्या प्रयत्नांना यश आले असून , भगूरला स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक त्रिपाठी साहेब  व मुख्याधिकारी डॉ.सचिन कुमार पटेल यांचे सहकार्य लाभले .

Share

Other News

ताज्या बातम्या