तहसीलदार जमदाडे यांच्यावर कारवाई साठी अमरण उपोषण...

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 20/05/2022 6:02 PM


आर टी आय न्यूज नेटवर्क
सातारा/ प्रतिनिधी

तहसीलदार जमदाडे यांच्यावर गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी

सातारादि.१७ :फलटण ते म्हासुर्णे या राज्य महामार्गाचे काम करणारी राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अवैध मुरूम व दगड उत्खनन केले होते या प्रकरणी सदरची कंपनी सील करून  दंडात्मक आदेश करून वाहतूक करणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. परंतु खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी दंडात्मक रक्कम वसूल न करता कंपनीशी अर्थपूर्ण संबंध ठेवत बेकायदेशीर वाहने तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करून सोडून दिल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार किरण जमदाडे यांच्यावर महसूल प्रशासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कायमचे सेवेतून निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.  यासाठी उपविभागीय अधिकारी दहिवडी यांच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
           गेल्या दोन वर्षापासून फलटण ते म्हासुरणे या राज्य महामार्गाचे काम राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असताना मौजे गोपुज ता. खटाव गट नं.८४६ मधून परवाण्याच्या नावाखाली पर्यावरण विभागाची कोणत्याही प्रकारचे परवानगी नसताना मोठ्या प्रमाणामध्ये भूसुरुंग स्पोट घडवत लाखो ब्रास मुरूम व दगड याचे अवैध उत्खनन केल्याचे लेखी निवेदन व तक्रारी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार वडूज खटाव यांनी संबंधित कंपनीला अवैध उत्खनन प्रकरणी लेखी आदेश काढत.६,४०४१६०० / -१,५४,८०००० कोटी रुपये दंड व इतर दंड आकारण्यात आला होता. तसेच संबंधित कंपनीची वाहतूक करणारी यंत्रसामग्री दिनांक २५/१/२०२२ रोजी लेखी आदेश काढत नऊ वाहने जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या वाहनांचे  नं खालीलप्रमाणे होते.१) mh12 RK 2677 (2) mh 12 nd 1209 ( 3)mh 12 sx 1163 (4)mh12 qw 9817 (5)mh12 9814 (6) mh12 fs 6257(7) mh12sf 6837 (8)mh12sf 6826 (9)mh12 sk 0881
 ही वाहने जप्त करून औंध पोलीस स्टेशन येथे जमा करून प्लांट सील करून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. परंतु संबंधित तहसीलदार किरण जमदाडे यांनी तहसीलदार या पदाचा दुरुपयोग करत कंपनीशी अर्थपूर्ण संबंध ठेवत महसूल प्रशासनाची  करून दंडात्मक रक्कम वसूल न करता सदर कंपनीची वाहने सोडून दिली असल्याने हा प्रकार गंभीर व बेकायदेशीर व महसूल प्रशासनाची फसवणूक केली जात असल्याने तात्काळ चौकशी करून किरण जमदाडे व इतर महसूल अधिकार्‍यांसह संबंधित कंपनीवर महसूल प्रशासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करून महसूल अधिकाऱ्यांना कायमचे सेवेतून निलंबित करून कंपनीकडून दंडात्मक रक्कम वसूल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे करून सेवेतून निलंबित करत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच चालू ठेवणार असल्याची माहिती आर. आर. पाटील लोकविकास प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी दिली.अधिकारी दहिवडी मान यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा आर आर पाटील लोकविकास  प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी दिली..


Share

Other News

ताज्या बातम्या