पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नालेसफाई आणि धोकादायक झाडांच्या फांद्या काढण्याची मोहीम राबवली आहे. मात्र 24 तास रहदारीचा मार्ग असणाऱ्या जिल्हा परिषदेसमोर मात्र महापालिका प्रशासनाचे लक्ष गेले की नाही? असा प्रश्न पडत आहे, कारण जिल्हा परिषदे च्या बरोबर समोर वाढलेली झाडे, त्यांच्या फांद्या रस्त्यावर आल्या असून या फांद्या नागरिकांसह वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. यामुळे एखादा अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन या झाडाच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत. लवकरात लवकर सदर झाडाच्या फांद्या तोडाव्यात.
*मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली*