सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत असून याला काही प्रमाणात महापालिका क्षेत्रात रस्त्याकडेला करण्यात आलेले अतिक्रमण ही जबाबदार आहे. कारण रहदारीच्या मार्गावरही रस्त्याकडे ला अनेक जणांनी अतिक्रमणे केली असून, यामध्ये हात गाड्या,दुकानाचे बोर्ड यांचा समावेश आहे. या अतिक्रमणांमुळेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे कालच एक उदाहरण घडले आहे. शर्वरी कुलकर्णी यां महाविद्यालयीन युवतीचा एसटी खाली येऊन अपघाती मृत्यू झाला आहे. याला पूर्णपणे रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण जबाबदार आहे.
आपण अतिक्रमण मोहीम हाती घेतलीच आहे तर अशा रहदारीच्या रस्त्यांवर असणारे अतिक्रमण ताबडतोब काढावे आणि असे अपघात टाळावेत यासाठी सदर अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र करण्यात यावी अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत.
शिवाय वाहतूक नियंत्रण कक्षानेही याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून अशा रस्त्यावर धंदा करणाऱ्या तसेच रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या नागरिकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, आणि सर्वसामान्य निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवावेत.
*मनोज भिसे- अध्यक्ष लोकहित मंच सांगली*