मल्हार क्रांती सेवा संस्था यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी जत येथे शालेय साहित्याचे वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/07/2025 9:05 PM

    मल्हार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांचे वतीने गेली ८ वर्षे गोरगरीब वंचित शोषित व गरजु विद्यार्थ्यांना आतापर्यंत जिल्हा परिषद व प्राथमिक शाळेतील ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे याचबरोबर डोंगरी व दुर्गम भागात बर्याच धनगर वाड्यावरती शालेय साहित्य वाटप केले आहे. काही खेळाडूंना आमच्या संस्थेने दत्तक घेऊन त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवणयाच काम करत आहोत. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव समारंभ. गरजु महिलांना साडी वाटप व तरूणांना उदयोग व्यवसायामध्ये आर्थिक मदत. याच बरोबर अनेक वृद्धाश्रम व अनाथाश्रमामधये धान्य फळें व कपडे वाटप केले आहे. निरंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज सेवेचा वसा घेतलेली मल्हार क्रांती सेवा संस्था आहे.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी जत येथे मल्हार क्रांती सेवा संस्था यांचे वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मल्हार क्रांती सेवा संस्था अध्यक्ष तानाजी व्हनमाने. शिव व्याख्याते प्रतिक पाटील सामाजिक कार्यकर्ते अमन सदे. नेहरू युवा केंद्र संचालक सागर व्हनमाने. भारूडकार विजय टेंगले. उद्योजक राहुल सरक. पत्रकार अर्जुन हजारे. पत्रकार अभिजीत साळुंखे. पत्रकार अरुण पाटील. प्रतिक कोळी.तेजस व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते..

मल्हार क्रांती सेवा संस्था यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी जत येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या