सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन हे निरभवलेले असून अनेक नागरी समस्या आव असून उभ्या असताना त्याबाबत केलेल्या तक्रारीचे निरसनही या व्यवस्थेकडून व्यवस्थितपणे केले जात नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून लोकहित मंच कडे येत आहेत.
सांगलीतील प्रभाग क्रमांक 15 मधील कृष्ण हॉस्पिटल जवळ गेल्या तीन महिन्यांपासून गटार चोकअप झाले असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाचे जबाबदार अधिकारी मुकादम स्वच्छता निरीक्षक यांना तक्रार करूनही सदर गटारीतील घाण काढून ती मोकळी केली गेलेली नाही. शिवाय या भागातील पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने या भागातील नळ कनेक्शनही चेक करावे या संदर्भात पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी साळुंखे यांना चार चार वेळा फोन करूनही अजून एकही कर्मचारी या भागात फिरकला नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांकडे किती डोळेझाक करतात हे दिसून येते. महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या विलंबाबाबत कठोरपणे जाब विचारावा. लवकरात लवकर ही गटार आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सदर गटारीतील घाण, स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून टाकणार असल्याचा इशारा आम्ही लोकहित मंचच्या वतीने देत आहोत.
*मनोज भिसे-- अध्यक्ष,लोकहित मंच सांगली*