आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दिनांक : राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात ० ते १८ वयोगटातील ११५ मुलांसाठी मोफत ते डी इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी २३ मुले हृदय शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली. या पात्र मुलांची हृदय शस्त्रक्रिया पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत केली जाईल.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज कर्पे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मेजर राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. सुभाष कदम, बालरोगतज्ञ डॉ. उल्का ध्वज, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. कुलकणी आणि निघोट येथील ज्युपिटर हॉस्पिटलमधील विशेषज्ञ डॉ. अभिजीत नाईक, डॉ. राहुल सराफ, आरबीएसके विभाग आणि डीईआयसी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात अंगणवाडी आणि शाळा तपासणी दरम्यान आढळलेल्या संशयित हृदयरोगी मुलांची मोफत ते डी इको तपासणी आयोजित करण्यात आली होती. सदर येथील शिबिर ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे आणि जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त शिक्षणाने घेण्यात आले. या शिबिरात एकूण ११५ मुलांची हृदयरोगाची तपासणी करण्यात आली.
आरबीएसके कार्यक्रम ही एक महत्त्वाची सरकारी योजना आहे आणि निरोगी आणि सुदृढ मुले ही उद्याचे भविष्य आहेत. या समाजातील लहान मुले ही पुढच्या पिढीचे दिवे आहेत. यामुळे या मुलांच्या आरोग्याबाबत जागरूक राहून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाने केलेल्या कामाबद्दल अभिमान व्यक्त केला.
ग्रामीण भागातील मुलांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. आरबीएसके टीम वेळोवेळी या सुविधा आणि उपचारांबाबत मार्गदर्शन करत आहे. सदर येथील आरबीएसके टीम अंगणवाडी आणि शाळांमध्ये जाऊन आरोग्यविषयक समस्यांचे महत्त्व पटवून देतात. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत, असे विविध शिबिरे वारंवार घेतली जातात आणि विद्यार्थी आणि मुले निरोगी कशी राहतील याची काळजी घेतली जाते. या कार्यक्रमांतर्गत, ग्रामीण भागातील लाभार्थी मुलांना आरबीएसके आणि डीईआयसी विभागांसारख्या खाजगी रुग्णालयांद्वारे सेवा दिली जाते. या विभागामार्फत सर्व चाचण्या आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.
जिल्ह्यातील सर्वोत्तम आरोग्य सुविधांबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज कर्पे यांनी या उपचारांपासून एकही मूल वंचित राहणार नाही याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. उल्का ध्वज बालरोगतज्ञ डॉ. व्यंकटेश गौर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. स्मिता देशमुख यांनी मानले.