शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे अश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या अश्वासनाला सरकारने हारताळ फासत बारा जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीसबंदोबस्तात सुरवात केली आहे. सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतीकार करीत आहेत. आणी मोजणी बंद पाडीत आहेत.
सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनीधींची बैठक पार पडली. आणी १ तारखेस अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा
निर्णय घेण्यात आला.
या अगोदर संवाद दुत म्हणुन
आलेल्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत.
शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कवठेमहांकाळ , तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत आप आपल्या गावातुन संवाद दुत म्हणुन आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले. व कोणताही संवाद न करता अधिकार्यांना आल्या पावली परत फिरावे लागले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही. हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखिल दाखवुन दिले आहे. आताही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. हा ईशारा आम्ही सरकारला देत आहोत.
शक्तिपीठ मुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे. सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगुन देखील मुख्यमंत्री आणी त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. म्हणुन ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणी शेतात राहील. त्याचा पहीला हिसका गावात आलेल्या अधिकार्यांना दाखवला आहे. पुढेही दाखवु पण महामार्ग होउ देणार नाही. आमची शेती वाचवु. त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे. दि. १ जुलै हा कृषी दिन आहे, विधानसभेचे अधिवेशन चालु होत आहे. म्हणून या दिवशी रास्ता रोको करणार आहोत. सांगली जिल्ह्यातील १९ गावातील शेतकऱ्यांनी तसेच महापुर बाधित जनतेनी १ जुलै रोजी १० वा. अंकली चौकात मोठ्या संख्येनी या आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे अवाहन आम्ही करीत आहोत.
महेश खराडे सतीश साखळकर प्रवीण पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके पैलवान विष्णुपंत पाटील यशवंत हरगुडे राजाराम माळी सतीश माळी अण्णासाहेब जमदाडे सुरेश पाचुंबरे अधिकराव शिंदे रवींद्र माळी भीमाना खाडे एकनाथ कोळी उत्तम शिंदे रघुनाथ पाटील विलास पाटील भाऊसाहेब लांडगे मुरलीधर निकम