आयकर भरणाऱ्यांनी स्वत:हून माहिती द्यावी व धान्यावरील हक्क सोडावा

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 14/08/2022 11:58 AM

आर टी आय न्यूज नेटवर्क 
सातारा /प्रतिनिधी 

  जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांचे आवाहन

 सातारा : सरकारी नोकरदार, बागायती शेती, खासगी क्षेत्रातील मोठे पगारदार याशिवाय आर्थिक सक्षम असणाऱ्यांना रेशनवरील स्वस्त धान्याचा हक्क सोडण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. आता आयकर भरणारे परंतु स्वस्त धान्यावर हक्क सांगून त्याची उचल करणारे पुरवठा विभागाच्या रडारवर आहेत. आयकर भरणाऱ्यांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी व धान्यावरील हक्क सोडावा अन्यथा तपासणीत आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले आहे. 

 गरीब, वंचित, भटक्या व स्थलांतरित नागरिकांना रेशनवरील स्वस्तातील धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेण्याता आला आहे. धान्यावरील हक्क सोडण्यासाठी वरील मंडळी स्वत:हून पुढे आली नाहीत तर पुरवठा निरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास यापूर्वी घेतलेल्या धान्याची मोजदाद करुन बाजारभावाने वसुली करण्यात येईल. शिवाय चुकीची माहिती सादर करुन स्वस्त धान्य मिळविण्याच्या उद्देशाने शिधापत्रिका मिळविल्याबद्दल थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. 

 नागरिकांनीही अशा लोकांची माहिती पुरवठा विभागाकडे द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनेही यासाठी पुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे. 
 

Share

Other News

ताज्या बातम्या