करांच्या पुर्नरचनेबाबत लवकरच निर्णय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/06/2023 11:11 AM



ॲड. अमित शिंदे यांच्याशी चर्चेवेळी आयुक्तांनी दिली ग्वाही

सांगली दिःमहानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या पुनर्रचेबाबत तसेच भाड्याच्या मालमत्तांना लावली जात असणारी घरपट्टीची चुकीची पद्धत बंद करण्याबाबत लवकरच निर्णय घेवू अशी ग्वाही माहापालिका आयुक्त श्री सुनिल पवार यांनी ॲड. अमित शिंदे यांना दिली. 

महापालिकेमधील मालमत्ता करांची पुनर्रचना करण्याची मागणी ॲड. अमित शिंदे यांनी केली आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त सुनिल पवार यांनी ॲड. अमित शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून संपूर्ण विषय समजून घेतला. यावेळी मालमत्ता करांच्या आकारणीमधील त्रुटी, इतर महापालिकांच्या तुलनेत सांमिकु महापालिकेचे असणारे जास्त कर, त्याचबरोबर भाड्याच्या मिळकत मालकांना मिळणाऱ्या एकूण भाड्याच्या ४० ते ५८ टक्के आकारली जाणारी घरपट्टी ही पूर्णतः चुकीचे असल्याचे ॲड. अमित शिंदे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच महापालिकेने भांडवली मूल्य निश्चित करून कर आकारणी करणे आवश्यक असून १९९८ साली झालेला ठराव व त्यानंतर २००३ ला दिलेली मंजुरी यानंतर मालमत्ता करांची पुनर्रचना झालेली नाही ही बाँब देखील निदर्शनास आणून दिली. या भाड्याच्या मालमत्तांचे कर कमी करण्यासाठी मालमत्तेच्या मालकांकडून खुलेआम पैसे घेतले जातात.  त्यामुळे लोक दोन भाडेकरार करत आहेत. एकात भाड्याची रक्कम कमी दाखवायची व एकात ठरलेली दाखवायची. यामुळे लोकांना त्रास होत आहे आणि शासनाचा महसूल पण बुडत आहे. ही करपद्धती बंद झाली पाहिजे. ताचबरोबर महापालिका लावत असलेल्या ४ टक्के साफसफाई कराबाबात च्या त्रुटीदेखील शिंदे यांनी सांगितल्या. 

*या बैठकीमध्ये आयुक्तांनी करांच्या पुनर्रचनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच भाड्याच्या मालमत्तांना सध्या लागू असलेली कर पद्धत बदलून भाड्याच्या रकमेऐवजी पूर्वी लागू असलेल्या घरपट्टीच्या रकमेमध्ये वाढ करून भाड्याच्या मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी व भांडवली मूल्य पद्धत स्विकारण्यासाठी लवकरच निर्णय घेवू असे सांगितले.*

यावेळी ॲड. अभिषेक खोत, जयंत जाधव उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या