राष्टवादी श. प. जिहाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते २७५ बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2025 3:45 PM

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने शहरजिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना 275 कुटुंबांना भांडी संच वाटप करणेत आले.

युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्ताफ मुल्ला,आदित्य नाईक,बैजू बोदरे,अक्षय माने यांच्या प्रयत्नातून सांगलीमधील विविध भागातील बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येतात याचाच भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भांडी संच वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेबांनी शहरातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा लाभ मिळवताना काही तांत्रिक अडचणी येत असतील तर पक्षाशी संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत अल्ताफ मुल्ला तसेच आदित्य नाईक यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अल्ताफ मुल्ला,आदित्य नाईक,बैजू बोडरे,अक्षय माने यांनी सातत्याने पाठपुरावा करत शहरातील गरजू आणि वंचित बांधकाम कामगारांच्या नोंदी करत त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम अविरत गेले अनेक वर्ष करत आहेत.इथूनपुढेही असेच काम त्यांच्या हातून घडो अशा शुभेच्छा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी दिल्या.

यावेळी भांडी संच वाटप योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे पक्षाचे अल्ताफ मुल्ला,आदित्य नाईक,बैजू बोदरे,अक्षय माने,सयाजी बनसोडे,कुलसूम शेख,ऍड.सुभाष बिरंगे,संगीता सरगर,विद्या बनसोडे,
शुभांगी बाबर,आरती साळुंखे,राणी साळुंखे,अंजुम नदाफ,शिवानी आवळे,ऐश्वर्या माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे,
सांगली शहर कार्याध्यक्ष धनंजय पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,समाजिक न्याय विभागाचे शहरजिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप व्हनमाने,पक्षाचे प्रमुख सचिव डॉ. शुभम जाधव,युवक राष्ट्रवादीचे शहरजिल्हा उपाध्यक्ष पप्पू कोळेकर,युवक राष्ट्रवादीचे शहरजिल्हा उपाध्यक्ष सुमुख पाटील,शहरजिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे,विपुल केरीपाळे,सेवादल सांगली शहराध्यक्ष दत्ता पाटील,सर्फराज शेख,युवकचे अक्षय गायकवाड,आदर्श कांबळे,सुरेश चौधरी सर आदी उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या