सांगली मार्गे धावणाऱ्या दोन साप्ताहिक रेल्वे गाड्यांनी दैनदिन करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचची तक्रार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/05/2025 5:33 PM

1) पुण-सांगली-एरनाकुलम(केरळ) मार्गावर धावणारी पूर्ना एक्सप्रेस गाडी क्र 11097/11098 ला नविन कोच(डब्बे) मंजूर करून ही गाडी दररोज दैनंदिन सोडण्यात यावी

2) बेंगलोर-सांगली-गांधीधाम मार्गावर धावणारी साप्ताहिक बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस गाडी देखील दैनंदिन करावी

पुणे-एरनाकुलम एक्सप्रेस व बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस गाड्या सांगली मार्गे गेली 20 वर्षे धावत आहेत. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा छान प्रतिसाद असून दोन्ही गाड्या वर्षभर फूल धावतात. 

*20 वर्ष आधी पुणे-सांगली-बेंगलोर एकेरी रेल्वे मार्गाची क्षमता कमी असल्याने साप्ताहीक गाड्या सुरू झाल्या*

ज्यावेळी या गाड्या सुरु झाल्या त्यावेळी पुणे-सांगली-बेंगलोर मार्ग डिझेल ईंजिनवर चालणारा एकेरी मार्ग होता. त्यामुळे मार्गाची क्षमता कमी असल्याने या दोन गाड्या साप्ताहीक(आठवड्यातून 1 दिवस) सुरू केल्या गेल्या. 

*पुणे-सांगली-बेंगलोर रेल्वे मार्ग दुहेरी होऊन क्षमता वाढली तरीही साप्ताहिक गाड्या दैनंदिन झाल्या नाहीत*
पण त्यानंतर रू 5 हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-बेंगलोर मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. त्यामुळे आता  पुणे-सांगली-बेंगलोर रेल्वे मार्गाची गती क्षमता वाढली आहे. वाढलेल्या क्षमतेचा फायदा घेऊन सांगली मार्गे अनेक नविन प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करता आल्या असत्या. तसेच सांगली मार्गे धावणार्या साप्ताहिक गाड्यांना दैनंदीन रोज चलवता येऊ शकते.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला सांगली जिल्हा नागरिक जाग्रुती मंच व प्रवाशांनी अनेक पत्रे लिहून सांगली मार्गे धावणार्या नविन गाड्या सुरू कराव्या तसेच पुणे-एरनाकुलम पूर्ना एक्सप्रेस व बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस गाड्यांना दैनंदिन चालवण्याची विनंती केली. पण त्यावर कोणतीही कारवाई मध्य रेल्वे किंवा दक्षिण पश्चिम रेल्वेने न केल्याने शेवटी ना-ईलाज सांगली जिल्हा नागरीक जाग्रृती मंचला प्रधान मंत्री कार्यालयाकडे तक्रार करावी लागली.

पुणे-एरनाकुलम एक्सप्रेस गाडी जुन्या डब्ब्यांसह धावत असून अनेक प्रवाशांनी या बाबत तक्रार केली आहे. पण तक्रारीची दखल मध्य रेल्वै घेत नसल्याने प्रधानमंत्री कार्यालयाकडे तक्रार करून सांगली मार्गे धावणार्या पुणे-एरनाकुलम एक्सप्रेस गाडीसाठी नविन कोच(डब्बे) देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या