कुपवाड पंचकल्याण पूजेच्या आठव्या दिवशी मंदिरातील मुख्य वेदीत व मानस्तंभात मूर्ती स्थापना, मानस्तंभ मस्तकाभिषेक व प्रतिमा मिरवणूक पार पडली.
कुपवाड पंचकल्याण पूजेच्या अंतिम दिवशी पहाटे मंगलवाद्य, मंगलाचरण झाले. यजमान अभय पाटील व सौ राधिका पाटील यांचे मंडपात मिरवणुकीने आगमन झाले. सकाळी अयोध्या नगरी सभा मंडपातून 24 तीर्थंकर मूर्तीं रथातून मिरवणूकीने मंदिरात आणण्यात आले. व मंदिरात मूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आले. जलकुंभ मिरवणूक पार पडली. निर्वाण कल्याणक क्रिया, निर्वाण प्राप्ती, निर्वाण लाडू अर्पण करण्यात आले.पंचामृताभिषेक, शिखरावरील ध्वज व सुवर्णकलश स्थापना करण्यात आले. 1008 कलशाने मंदिरात व मानस्तंभात महा मस्तकाभिषेक करण्यात आले. त्यानंतर विश्वशांती महायाग, दशांशाहुती होम क्रिया पार पडली. दुपार सत्रात आचार्य श्री जीनसेन जी महाराज यांचे गुरुउपदेश झाले. महाराजांनी सर्वांना आशीर्वाद प्रदान केले. त्यानंतर सत्कार समारंभ, पंचकल्याणक पूजन विसर्जन, आरती, ध्वज अवरोहण, कंकण विमोचन झाले व सायंकाळी सौधर्म इंद्र अभय पाटील व सौधर्म इंद्रायणी राधिका पाटील यांना हत्तीवरून संवाद्य मिरवणुकीने घरी पोहोचवून पंचकल्याण पूजेचे समारोप करण्यात आले.
यावेळी पंचकल्याण पूजेचे प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्ये सह प्रतिष्ठाचार्य जिनेंन्द्र उपाध्ये, सिद्धांत उपाध्ये, दीपक उपाध्ये मल्लेवाडी, प्रशांत उपाध्ये, प्रवीण उपाध्ये, कोमल उपाध्ये, अरिहंत उपाध्ये, सचिन उपाध्ये यांचा व स्थानिक पंडित प्रकाश उपाध्ये, वर्धमान उपाध्ये, श्रेयांश उपाध्ये,संगीतकार विद्याधर बडबडे, धनंजय गौंडाजे, अभय गौंडाजे, देशभक्त आर पी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ संध्या चव्हाण, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, श्रीमती शोभा पाटील, संतोष कुमार घसघसे, रोनक सूर्यवंशी, मंगल भरत पाटील. यांचा मंदिरास व पूजेस योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.