एसटी महामंडळचे भाऊसाहेब हिरे सेवा निवृत्त

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 01/06/2023 5:40 PM

भगुर(प्रतिनिधी) मनमाड येथील गायकवाड चौक 52
नंबर मधील भाऊसाहेब तुळशीराम हिरे मनमाडच्या
एसटी महामंडळ डेपोतुन प्रमुख कारागीर पदावरुन 37 वर्षेच्या सेवेनंतर ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त एसटी महामंडळ अधिकारी कामगार
यांनी प्रथम डेपोमध्ये भाऊसाहेब हिरे यांच्या कामाचे
कौतुक करुन महामंडळाच्या वतीने सेवापुर्ती सन्मान
पदक तर कामगार वतीने गौरव चिन्ह वाँशिंग मशीन
भेट देण्यात आली तर मनमाड गायकवाड चौक(52)
निवासस्थानी भव्य आकर्षक मंडप डेकोरेशन करीत
फटाके फोडत डिजेच्या तालावर नाचत मनमाड शहरातुन सेवानिवृत्त भाऊसाहेब हिरे.पत्नी वंदना हिरे
यांची कार्यकर्ते नातेवाईक आप्तेष्ट प्रतिष्ठित नागरिक
मिरवणूक काढली.त्यानंतर व्यासपीठावर सौ.वंदना
व भाऊसाहेब हिरे पती पत्नी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या प्रतीचे पुजन केले या वेळी बौद्धधम्म वंदना करीत भाऊसाहेब हिरे आणि
वंदना हिरे पती पत्नीने एकमेकांना पुष्पहार घालून सत्कार केला व मान्यवर मनमाड नगराध्यक्ष राजेंद्र.डी. पगारे.नगरसेवक गणेश धात्रक.संतोष बळीद.पत्रकार
विलास.डी.भालेराव.पोलिस हवा.चेतन कांबळे.सह
दिपक पगारे.निलेश अहिरे.विनोद गुंजाळ.अक्षय हिरे
विकास घोडके.शारदा जाधव.पद्माबाई गांगुर्डे.रुपाली
अहिरे.लिलाताई पवार.नयना आढागळे.मायाताई हिरे
सोनल कोठारी.दिलीप केदारे.महेश कांबळे.निखिल
भालेराव.वंश आहिरे.काजल अहिरे.यांनी जल्लोषात अभिनंदन केले व सर्वानी भोजनाचा आस्वाद घेतला

Share

Other News

ताज्या बातम्या