पेंढरी येथे इयत्ता ८ व्या वर्गाची अतिरिक्त तुकडी मंजूर करा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 01/06/2023 9:56 PM



आमदार डॉक्टर देवराव होळी यांना स्थानिकांचे निवेदन

आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत १ तुकडी वाढवून देण्याची मागणी


इयत्ता ८ वी ची तुकडी नसल्याने विद्यार्थ्यांना सोडावे लागत आहे शिक्षण

मौजा पेंढरी तालुका धानोरा येथील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेत इयत्ता ८ वी ची एकच तुकडी असून जिल्हा परिषदेच्या शाळेतही फक्त इयत्ता १ ली ते ७ व्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना ८ वी मध्ये प्रवेश घेताना एक तर आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेत नाही तर बाहेर कुठेतरी प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्याना अडचणींना सामोरे जावे लागत असून शिक्षणापासून वंचित  राहण्याची पाळी त्यांच्यावर येत आहे.  त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेमध्ये इयत्ता ८ व्या वर्गाची किमान १   वाढीव तुकडी मंजूर करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी विनंती करणारे निवेदन  आमदार डॉक्टर देवराव होळी यांना दिले.

पेंढरी येथे आदिवासी विकास विभागाची उच्च व माध्यमिक आश्रम शाळा आहे. परंतु त्यामध्ये १ ते १२ या वर्गाची एकच तुकडी असल्याने परिसरातील इयत्ता ७ वी पास झालेले विद्यार्थी तेथे प्रवेशासाठी येतात. मात्र या विद्यार्थ्यांना  तिथे प्रवेश मिळत नाही. त्यामुळे  विद्यार्थ्यांना मोठ्या  संकटांना सामोरे जावे लागते. करिता या ठिकाणी वाढीव तुकडी मंजूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता वाढीव तुकडी मंजूर करून त्यात या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी मागणी निवेदकांच्या  आमदार डॉक्टर देवराव होळी शासणाला केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या