मनपा क्षेत्रातील हॉटेल व लॉज मालकांची आयुक्तां सोबत बैठक, बायोडायझेशन प्रकल्प उभारण्याचे आयुक्तांचे आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/12/2023 10:55 AM



हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेल लॉजच्या आवारात बायोडायझेशन प्लांट उभारण्याची ग्वाही दिली.

हरित न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी महापालिकेत मनपा क्षेत्रातील हॉटेल तसेच लॉज चालकांची बैठक आज दि ८/१२/२०२३ रोजी घेतली.

बैठकीस उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

बायोडायजेस्टर आहे .
केंद्र सरकारची संस्था -DRDO(Defence Research & Development Organization) संरक्षण,संशोधन आणि विकास संस्था,यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आहे .यावेळी हॉटेल किंवा लॉज सिव्हेज किंवा बायोडायझेशन बद्दल सर्वांना माहिती देण्यात आली.

हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग मधून जे सिव्हेज  निर्माण होते ते सिव्हेज  बायोडायझेशन प्लांटमध्ये घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या चांगल्या पाण्याचा पण तुम्ही पुर्नरवापर कसा केला जाईल यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

सांगलीच्या श्रेयश जोशी यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि यासाठी जी यंत्र सामुग्री पाहिजे त्याचे प्रात्यक्षिक सर्व हॉटेल व्यवसायिकांच्या पुढं सादर करण्यात आले. 

यामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेल लॉजच्या आवारात बायोडायझेशन प्लांट उभारण्याची ग्वाही दिली.

 बैठकीस खाद्य पेय विक्रेत संघटना लहूदादा भडेकर,संचालक सुजित राऊत राजेंद्र माळी, बाळासाहेब फोंडे , चंद्रकांत पोटे, शिरीष सुर्यवंशी , हॉटेल चालक मालक संघटना अध्यक्ष शैलेश पवार, माजी नगरसेवक हरिदास पाटील, के के नाग प्रायव्हेट कंपनीचे संचालक संजय  महाबळेश्वरकर, डॉ. गिरीश कुलकर्णी, श्रेयस जोशी आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या