मा. ना.शिवेंद्रराजे भोसले,
सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय-- सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अपूर्ण कामाबाबत
महोदय,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक नवीन रस्त्या नाही मोठ मोठी भगदाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत त्या त्या वेळी महानगरपालिका प्रशासनाशी निवेदनाद्वारे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. याकडे आपण कृपया लक्ष घालावे.
शिवाय सांगली मिरज रोडवर असणारे रेल्वे पूल स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये कमकुवत झाल्याचे आढळले असून, या तुला पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधणे साठी मंजुरी मिळाली असूनही अजूनही ते काम सुरू झालेले नाही. या रस्त्याला पर्यायी रस्ता लवकरात लवकर काढून मोठी दुर्घटना घडण्याआधी सदर पूल पाडून त्या ठिकाणी नवीन फुल बांधण्यात यावे.
त्याचबरोबर सांगलीतील आयुर्विन पुराला पर्याय असणारे पूल बांधण्यात आले असून त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपण लक्ष घालून संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी आम्ही लोकहित मंचच्या वतीने आपणाकडे मागणी करत आहोत.
आपण याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या कामाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा!
कळावे
मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली