कुपवाड पंचकल्याणक महोत्सवात मुलांचे मौजी बंधन, राज्याभिषेक : नजराणा दृष्याने वातावरण भक्तिमय...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/05/2025 6:20 PM

    . कुपवाडमधील पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात आज मौजी बंधन संस्कार व राज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडला. 
     कुपवाडमधील पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या पाचव्या दिवशी मंगळवार दिनांक 4 मे रोजी आयोध्या नगरी सभा मंडपातील नित्य पूजा विधी नियमितपणे पार पडले. सकाळच्या सत्रात मुलांचे मौजी बंधन संस्कार व मुलींवर सरस्वती संस्कार झाले. दुपारी राज्याभिषेक व नजराना विधीने वातावरण भक्तीमय बनले होते. राज्याभिषेक सोहळ्यात आदिनाथ महाराजांचा राज्याभिषेक दृश्य साकारण्यात आले. 32 हजार मुकुटबद्ध राजे राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. देशविदेशातून आलेल्या राजानी हिरे माणिक मोती आदी किंमती नजराना पेश केला.त्यानंतर निलांजना नृत्य सादर झाले. त्यानंतर शास्त्रोक्त दीक्षा कल्याणक विधी पार पडला. दरम्यान पहाटे मंगलवादी घोष, मंगलाचरण, सौ धर्म इंद्र इंद्रायणीचे हत्तीवरून मिरवणुकीने मंडपात आगमन, पंचामृताभिषेक, शांती मंत्रपठन होम हवन पार पडले.दुपार सत्रात आचार्य श्री शितल सागर जी महाराज व आचार्य श्री जिनसेन जी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले. जिनवाणी मिरवणूक, देव शास्त्र गुरू आरती, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. संध्याकाळी 56 घोड्यावरून 56 राजाची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
 यावेळी पंचकल्याण पूजेचे आहार दात्ये महावीर पाटील,सौ.पद्मश्री पाटील या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.दरम्यान दुपारी आचार्य कुंथुसागर महाराज व त्यांच्या संघातील 15 मुनी महाराज पंचकल्याणक पूजेस भेट देऊन श्रावक-श्राविकाना आशीर्वाद दिले.
         पंचकल्याण पूजेस माजी खासदार राजू शेट्टी.माजी नगरसेवक शठजी मोहीते.वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, यांनी भेट दिली. कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
*कुपवाड पंचकल्याणात बटुकावर मौजीबंधन संस्कार करताना फोटोमध्ये दिसत आहेत 

Share

Other News

ताज्या बातम्या