अधिकार्‍यां सोबत सुधार समितीने केली मिरज - मालगाव रस्याची पहाणी..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/12/2023 4:59 PM


आठवड्यात झाडे हटविण्याचा निर्णय 
मिरज सुधार समितीचे आंदोलन स्थगित 
________________________________________ 

मिरज-मालगांव रस्ता कामात अडथळा ठरणारे झाडे आठवड्यात हटविण्याचे तसेच कामाच्या दर्जा बाबत विशेष लक्ष देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिरज सुधार समितीसोबत झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे रविवारी मिरज सुधार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मिरज सुधार समितीच्या वतीने सांगण्यात आले.

मिरज-मालगांव रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. रस्त्यावरच वाळू, भंगार, लोखंड विक्रीचे डेपो (दुकाने), चारचाकी वाहनांचे गॅरेज थाटली आहेत. रस्ता करताना अपघात होऊ नये म्हणून ठेकेदाराने कोणतेच उपाय योजना तसेच, रस्ता कामात अडथळा ठरणारे झाडे सुध्दा हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.  रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे.

म्हणून मिरज सुधार समितीने रविवारी १० डिसेंबर रोजी मिरज-मालगांव रोडवर रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार  मिरजकर, शाखा अभियंता (वर्ग-1) किशोर पोवार, ए. बी. शेख, मनपा अधिकारी डी. डी. पवार, वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता सुनील व्हानमाने आदी अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. रस्ता कामात अडथळा ठरणारे 43 झाडे, 31 विजेचे खांब हटविण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहीर मुजावर, राकेश तामगावे, श्रीकांत महाजन, राजेंद्र झेंडे, अफजल बुजरूक, सलीम खतीब, वसीम सय्यद आदी सदस्यांसमवेत रस्त्याची पाहणी केली.

Share

Other News

ताज्या बातम्या