अन्न्‍ व औषध, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 09/12/2023 6:35 PM


 

गडचिरोली, (जिमाका) दि.09 : अन्न्‍ व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.10 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथून ब्रम्हपूरी-आरमोरी मार्गाने सकाळी 10.45 वाजता एम.आ.डी.सी कोटगल येथे आगमन व एलटीबी बेवरेजेस उद्योग प्रकल्पाच्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.15 वाजता जवाहर भवन समोर कॉम्पलेक्स गडचिरोली येथे आगमन व सहाय्यक आयुक्त , अन्न व औषध प्रशासन कार्यालय गडचिरोली येथील इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. तसेच 11.40 वाजता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आगमन  व रुग्णालयातील आवारात कॅथलॅब सुविधेसाठी नविन इमारतीच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती.दपुारी 12.15 वाजता मुलीचे वस्तीगृह , विसापूर रोड, गडचिरोली येथे आगमन व मागासवर्गीय मुलीचे वस्तीगृह इमारतीच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता गोंडवाना कला दालन पोटेगाव रोड गडचिरोलीकडे आगमन व राष्ट्रीय मानवाधिकार संस्था (एसो) दिल्ली यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार दिवस समाज गौरव सन्मान कार्यक्रमास उपस्थिती.  दुपारी 03.00 वाजता  गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

Share

Other News

ताज्या बातम्या