बेकायदा गॅस रिफिलिंग अड्डयावर तातडीने कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यां सह पुरवठा अधिकाऱ्यांना लोकहित मंचचे निवेदन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2024 6:15 PM

सांगली प्रतिनिधी 
      मिरज हे जसं सांस्कृतिक नगर आहे. तंतू वाद्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसे ते दोन नंबर धंद्यांसाठी व  बेकायदेशीर व्यवसायासाठीही कुविख्यात आहे.अमली पदार्थांची विक्री, मानवी तस्करी, जुगार, मटका आणि आता बेकायदेशीर गॅस रिफिलिंग व्यवसाय नावारूपाला येऊन अनेक जण यामध्ये लखपती झालेयत.यासाठी घरगुती गॅस सिलेंडर काळा बाजाराने चढ्या भावाने विकत घेऊन तो बेकायदेशीरपणे जादा रक्कम घेऊन वाहनांमध्ये भरला जातो .यामध्ये दिवसभरात 25 ते 30 सिलेंडर विकले जातात.ज्यादा भावाने हा गॅस गाड्यांमध्ये भरल्याने अड्डा मालकास दररोज पाच ते सहा हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळतो त्यामुळे सध्या हा धंदा जोरात आहे .परंतु त्यांना दररोज 25 ते 30 सिलेंडर ते ही घरगुती सिलेंडर मिळतात कोठून ? हा प्रश्न उपस्थित होतो.हे बेकायदेशीर सिलेंडर पुरवण्यामध्ये पूर्णपणे पुरवठा विभाग जबाबदार असून ,त्यांच्याच वरदहस्तामुळे हे सिलेंडर उपलब्ध होत आहेत .असा आमचा आरोप आहे .
               मिरज मध्ये हा गॅस भरताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत .हे बेकायदेशीर अड्डे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ असून,या अड्ड्यांवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करून हे अड्डे उध्वस्त करावेत अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आले आहे  .
           यापूर्वीही लोकहित मंचच्या वतीने या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देऊन मागणी केली होती तेव्हापासून आज तागायत प्रशासनाने याकडे डोळेझाक करण्याचंच काम केलंय.या बेकायदेशीर रिफिलिंग अड्ड्यांना घरगुती गॅस सिलेंडर पुरवणाऱ्या गॅस एजन्सीची ताबडतोब चौकशी करून दोषी आढळणाऱ्या गॅस एजन्सी चे परवाने रद्द करावेत आणि मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत . 
           दरम्यान पोलिसांना हे अड्डे माहित आहेत परंतु जोपर्यंत एखादी मोठी दुर्घटना घडत नाही अथवा कोणी त्या विरोधात तक्रार करत नाही तोपर्यंत हे पोलीस त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत.लवकरात लवकर या अशा बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनास आदेश द्यावेत.अन्यथा येणाऱ्या काळात लोकहित मंचच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे   .
कळावे यावेळी जयराज पाटील, मिलिंद कांबळे, सयाजी घाटगे आदी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या