माळेगावात सात तमाशा फडांच्या सादरीकरणातून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/12/2025 1:45 PM

नांदेड :- माळेगावची यात्रा ही राज्यातील आगळीवेगळी व वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणून ओळखली जाते. लोकनाट्य तमाशा, पारंपरिक लावणी आणि महाराष्ट्राची समृद्ध लोकधारा यांचे जिवंत दर्शन माळेगाव यात्रेत अनुभवायला मिळते.
     यावर्षी माळेगाव यात्रेत एकूण सात नामांकित लोकनाट्य मंडळ दाखल झाले असून ग्रामीण भागातील लोकसंस्कृतीचा ठेवा येथे खुलून दिसत आहे. तमाशा, लोकनाट्य, गणगवळण, बतावणी, मुजरा, फड, ढोलकीची जुगलबंदी आणि पारंपरिक लावण्या अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण या फडांमधून होत आहे. कलावंतांनी लिहिलेल्या सामाजिक व धार्मिक आशयाच्या वगांमधून समाजप्रबोधनासोबतच मनोरंजनाचीही प्रभावी सांगड घातली जात आहे. या फडातून  माळेगाव यात्रेत लोककलेची मुक्त उधळण पाहावयास मिळत आहे. प्रत्येक फडामध्ये एकाहून एक सरस व अनुभवी कलावंत सहभागी असून प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.
      रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, रुपाली पुणेकर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे, आश्विनी-शिवाणी बोरगावकर, सविताराणी पुणेकर,आनंद लोकनाट्य आणि शिवकन्या बडे हे सात लोकनाट्य मंडळ माळेगावात आले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या