माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाचे भव्य उद्घाटन शेतकरी, कष्टकरी व कलावंतांच्या सन्मानाची परंपरा माळेगावची- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/12/2025 7:44 PM

नांदेड - माळेगाव यात्रा ही शेतकरी, कष्टकरी आणि कलावंतांची यात्रा असून या ठिकाणी त्यांच्या कलेचा आणि मेहनतीचा सन्मान केला जातो. लावणीसारखा पारंपरिक लोककलेचा प्रकार खुल्या वातावरणात सादर करण्याची माळेगावची समृद्ध परंपरा असून अकलूजच्या धर्तीवर माळेगावात लावणी महोत्सव सुरू करण्यात आला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
       श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित लावणी महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. याप्रसंगी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, लोहा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी. बी. गिरी, शिक्षणाधिकारी माधव सलगर, सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, दत्ता वाले, सुधाकर शिंदे, आनंदराव शिंदे, सचिन पाटील चिखलीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी श्याम पाळेकर, अश्विनी जगताप, तहसीलदार परळीकर, उपजिल्हाधिकारी दापकर, बाळासाहेब मुळे, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मनोहर भोसीकर, माधवराव पावडे, दत्ता वाले, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, आनंदराव ढाकणीकर नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, गणेशराव साळवे, अनिल पाटील बोरगावकर, बालाजी राठोड, आनंदराव गुंडले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
       यावेळी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले, माळेगाव यात्रेचे जिल्हा प्रशासनाने अत्यंत सुयोग्य नियोजन केले असून त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे व पोलीस यंत्रणेचे आभार मानले. लावणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मानधनात वाढ करण्यात आली असून भविष्यात आणखी मोठे व सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यासपीठावरून अनेक कलावंत मोठे झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. लावणी महोत्सवामुळे माळेगाव यात्रेच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली असून यात्रेकरूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या