नांदेड :- सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपूरी नांदेड येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक संवर्गातून पद भरावयाचे आहे. माजी सैनिक उपलब्ध नसल्यास नागरी सिवीलीन संवर्गातून पद भरण्यात येतील.
पदाचा तपीशील - साहेयक वसतीगृह अधिक्षक पद संख्या 1 पात्रता शिक्षण 10 वी पास, वय 1 जानेवारी 2026 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. तरी आपण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 31 डिसेंबर 2025 पर्यत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधीक्षक अर्जून जाधव – 8380873985 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.