इन्कम टॅक्स रिटर्न्स / जी एस टी रिटर्न फाईल करणे अत्यंत गरजेचे : सी ए निलेश पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/05/2024 10:31 PM


     छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायापासून ते नोकरी करणाऱ्या सर्वांनी इन्कम टॅक्स व जीएसटी (व्यावसायिक बंधू) यांना भरणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे प्रत्येकाची जगण्याची पथ सुधारते. यामुळे बँकेमध्ये लोन उपलब्ध होण्यास मदत होते. यापूर्वीच्या करप्रणाली आणि आत्ताची करप्रणाली यामध्ये बराच बदल झाला आहे. याबद्दलचीही उकल या चर्चे दरम्यान करण्यात आली. जुनी कर प्रणाली व नवीन कर प्रणाली यांच्यापैकी कोणती करप्रणाली आपण निवडली पाहिजे व कशी निवडली पाहिजे हे अत्यंत सोप्या व सहज शब्दात त्यांनी समजावले.
आता सहज सुविधा उपलब्ध आहेत. हजारो वर्षापासून कर प्रणालीतूनच समाजाचा, देशाचा विकास साधण्यासाठी उपयोग झाला आहे. भारतात मात्र अजूनही 15 ते 18% लोक कर भरतात. काही लोक बँकेत लोन मिळावे यासाठी कर भरताना दिसून येतात. असे मत युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने चालू असलेल्या आपुलकीच्या कट्ट्यावरती सीए निलेश पाटील यांनी व्यक्त केले. उपस्थित अनेकांच्या प्रश्नांना निलेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
     यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे, रेखा पाटील, पांडुरंग शिंदे, सुलोचना पवार,भीमराव कुंभार,दीपक महामने, विजयमला कदम , बी बी साठे, सी जी टेके, जयंत निरगुडे,प्रशांत सूर्यवंशी, संतोष भुतेकर,एम व्ही जाधव, रमेश घोंगडी, हेमलता मदने, दर्शना घोंगड, अजित पाटील, वडगाव सर व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या