मिरज जंक्शन डिव्हीजन व सकाळची कलबुर्गी एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2025 3:10 PM

     मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर मिरज सासवड रोड (पुणे) व मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील कुर्डूवाडी पंढरपूर मिरज तसेच दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील लोंढा बेळगाव मिरज हा भाग एकत्रित करून स्वतंत्र मिरज विभाग करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संस्था या प्रवासी संघटनेकडून सांगलीचे खासदार मा. श्री. विशाल दादा पाटील यांच्याकडे करण्यात आली.
           सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस नव्याने सुरू करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूरहून गाडी सोडणे शक्य नसेल तर ही गाडी मिरज जंक्शन मधून सोडण्यात यावी ती ही शक्य नसल्यास गाडी क्रमांक 71422 मिरज कुर्डूवाडी डेमो एक्सप्रेस या गाडीचा कलबुर्गी पर्यंत विस्तार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
             मिरज जंक्शनचे यापूर्वी अनेक वेळा मॉडेल स्थानक व अमृतभारत योजनेतून पुनर्विकास करण्याच्या रेल्वे प्रशासनाकडून अनेक घोषणा झाल्या परंतु सर्वे च्या पलीकडे कुठलीही काम गेलेले नाही त्यामुळे ताबडतोब मिरज जंक्शनचा सर्वे पूर्ण करून या स्थानकाचे मॉडेलमध्ये पुनर्विकास करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
          यावेळी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत,संदिप शिंदे,राजेंद्र पाटील, वाय. सी. कुलकर्णी, महेश भोसले, राकेश कोळेकर आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या