सांगलीत खडडा पडण्याचा सिलसिला चालूच,

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/09/2025 3:39 PM

डॉक्टर टी आर पाटील मार्ग कत्तलखान्यासमोर अचानक खड्डा पडला आहे. 
सदर रस्ता म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ड्रेनेज विभागाचे जागतिक दर्जाचे काम आहे असे म्हणावे लागेल.
गेले कित्येक वर्षापासून सदर रोडला ड्रेनेज पाईपलाईन टाकायचे काम चालू आहे त्याला कुठले जागतिक तंत्रज्ञान वापरलेले आहे हे महानगरपालिकेलाच माहिती...
सांगली शहरात अशा पद्धतीने खड्डे पडणे ड्रेनेजचे नवीन राहिलेले नाही..
तो कित्येक कोट्यावधी रुपयेचा रोबोट नेमकं काय काम करतो महापालिकेलाच नाही 
आयुक्त साहेबांना विनंती आहे आपण स्वतः पाहणी करून सदर रोडचे ड्रेनेजचे काम इतके वर्षे का  रेंगाळले आहेत व असे प्रकार का वारंवार घडत आहेत या बाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी 
अन्यथा स्थानिक लोकांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल 

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या