शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या, निकाल पत्राची करणार होळी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/09/2025 3:36 PM

शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसुचनेला घेण्यात आलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत. तसे निकाल समजाची प्रत प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना दिली जात आहे. या निकालपत्राची होळी दि. ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहीजे या मागणीसाठी गेल्या दिड पावणेदोन वर्षापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी निर्णय जाहीर करताना दिसत आहे. शेतकऱ्यांचा विरोध तीव्र असुन देखिल. सरकारने जमिन अधिग्रहणाचे काम चालुच ठेवले आहे. त्यासाठी विस हजार कोटी रु. ची तरतुद करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. 
हरकती सादर करीत असताना शेतकऱ्यांच्या असणाऱ्या बागायती जमिनी, त्या बागायती करण्याकरीता केलेला खर्च, त्यातुन मिळणारे उत्पन्न,  पुढील अनेक पिढ्यांचे होणारे नुकसान,  उत्पन्नाचे लोप पावणारे साधन, शेतीचे होणारे दोन भाग, उर्वरित शेतीसाठी बंद होणारे पाण्याचे स्त्रोत, नदीकाठावरील भागात तयार होणारी पुरसदृष्य परस्थिती या सर्व बाबी मा. उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर मांडलेल्या होत्या. त्यांनी यापैकी कोणत्याही बाबींचा विचार न करता या हरकती फेटाळल्या आहेत. याचा आम्ही निषेध करुन यावर दिलेल्या निकालपत्राच्या प्रतीची आम्ही दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्याचा निर्णय जाहीर करीत आहोत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे अवाहन आम्ही करीत आहोत. 

आपले,

उमेश देशमुख महेश खराडे सतीश साखळकर प्रवीण पाटील प्रभाकर तोडकर उमेश एडके पैलवान विष्णुपंत पाटील यशवंत हरगुडे राजाराम माळी सतीश माळी अण्णासाहेब जमदाडे, सुनिल पवार 
अधिकराव शिंदे रवींद्र माळी भीमाना खाडे एकनाथ कोळी उत्तम शिंदे रघुनाथ पाटील विलास पाटील भाऊसाहेब लांडगे मुरलीधर निकम, संतोष लोहार, नितीन झांबरे.

Share

Other News

ताज्या बातम्या