प्रशासन सातत्याने गणेश उत्सव काळात गणेश मूर्ती कृत्रिम कुंडामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आव्हान करीत असते.
या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गणेश भक्त कृत्रिम कुंडामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जन करीत असतात.
परंतु कुपवाड मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वातीने कृत्रिम कुंड ठेवले आहेत. आज विसर्जनाचा 9 वा दिवस असल्याने. गणेश विसर्जन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात गणेश भक्त येत असतात. खरं हे कुंड पूर्णता पाण्याविना मोकळे ठेवले आहेत. ह्या मोकळ्या कुंडामुळे आता गणेश मूर्ती विसर्जन कुठे करायचे हा मोठा प्रश्न गणेश भक्तांपुढे निर्माण झाला आहे.
यांची त्वरित दखल घेऊन महापालिकेने कुंडामध्ये पाणी भरावे अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.