राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांच्या वतीने कुपवाड मध्ये गणेश विसर्जन सातवा दिवस मिरवणूक मंडळांचे स्वागत करण्याकरता भव्य स्वागत स्टेज उभारून मंडळाचे स्वागत करण्यात आले. तसेच स्वागत स्टेजला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
कुपवाड मध्ये गणपती विसर्जन सातवा दिवस मंडळांच्या मिरवणूकीचे स्वागत करण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष (भाऊ) धोतरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष मा.प्रा.पद्माकर जगदाळे (सर) यांच्या मार्गदर्शनाने भव्य स्वागत स्टेज उभा केला होता. त्या स्वागत स्टेज चे उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष पदमाकर जगदाळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्वागत स्टेजला माजी मंत्री, आमदार जयंत पाटील साहेब, जनस्वराज्य शक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजपाचे नेते शेखर इनामदार साहेब, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा व भाजप नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक भांडवलकर साहेब, माजी नगरसेवक गजानन मगदूम, युवक शहरजिल्हा अध्यक्ष आकाश माने, जय हिंद सेनेचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण, माजी नगरसेवक विष्णू माने, माजी उपमहापौर मोहन जाधव, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, शिवसेना उबाटा मिरज तालुकाध्यक्ष महादेव मगदूम, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग आघाडी शहर जिल्हाध्यक्ष संजय कदम, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबक्ष गडेकरी, राष्ट्रवादी शहरजिल्हा उपाध्यक्ष मुसा शेख, राष्ट्रवादी ओबीसी सेल शहरजिल्हाध्यक्ष अमोल धोत्रे, राष्ट्रवादी कामगार सेल शहरजिल्हा अध्यक्ष मुजफ्फर सनदी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहरजिल्हा अध्यक्ष तोहीद फकीर, कुपवाड पत्रकार संघाचे अध्यक्ष दरीकांत माळी, व्यापारी संघटना माजी अध्यक्ष विजय खोत, दैनिक पुण्यनगरी पत्रकार अभिजीत परीट, भाजपा नेते महेंद्र पाटील, बामणोळी ग्रामपंचायत सदस्य नाना चिंचकर, युवती राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रणोती हिंगलगे, वृद्धाश्रम अधीक्षक अहिंसक धोतरे, युवा नेते परवेज मुलाणी, राष्ट्रवादी ओबीसी सेल शहरजिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, राष्ट्रवादी कुपवाड महिला अध्यक्ष सुनीता जगदने, माजी दर्गा सरपंच रफिक मुजावर, सामाजिक कार्यकर्ते निलेश साखरे, झाकीर मुजावर, नजीर मुजावर, दिलीप धोतरे, व्यापारी नेते शाम भाट, सराफ व्यापारी बाळू दीक्षित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत सोहळ्याचे संयोजन अरुण रुपनर (तात्या), बल्लू शाकला, रमेश जाधव, अजय कोरे, दिनकर चव्हाण, निसार मुजावर, राहुल डोकते दाऊद मुजावर, दादासो कोळेकर, अमित कांबळे, स्वप्नील धोतरे, संतोष माळगे, प्रत्येक धोतरे, प्रतिक धोतरे, सुमित कांबळे, गणेश धोतरे, नितिन पवार, योगेश वाघमारे, प्रविण सरोदे, उमेश सरोदे, प्रशिक धोतरे, अभय कांबळे, अमन आठवले, साहिल मराठे, आर्यन धोतरे, आयुष आठवले, श्रेयस कांबळे इत्यादी सहकाऱ्यांनी व परिवर्तन फौंडेशन, आशुतोष (भाऊ) धोतरे मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी स्वागत स्टेज सोहळ्याचे आयोजन केले.
जिल्ह्यातील विविध राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वागत स्टेजला उपस्थित राहून. गणेश विसर्जन मिरवणूक मंडळांचा उत्साह वाढवला तसेच उपस्थित नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कुपवाड मध्ये सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुका अत्यंत उत्साहात निर्विघ्न पार पडल्या. कुपवाड पोलिसांच्या वतीने कुपवाड मध्ये चोख पोलीस बंदोबस्त, वाहतूक इत्यादीचे काटेकोरपणे नियोजन करून गणेश विसर्जन मिरवणुकांचां सातवा दिवस अतिशय उत्साहात पार पडला.