बनावट विमा पॉलिसी प्रकरणात अटकेनंतर आरोपीस न्यायालयाक न्यायालयाकडून दिलासा, अटीसह जामीन मंजूर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/12/2025 1:32 PM


पुणे,
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भादंवि कलम 420, 465, 468 व 471 अन्वये फसवणूक व खोटी कागदपत्रे तयार करून ती वापरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीची न्यायालयाने अटी व शर्तीसह जामीनावर मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणात आरोपीने  वाहन खरेदी केले होते. मात्र ते वाहन स्वतःच्या नावावर नोंदणी न करता मूळ मालकाच्या नावावरच ठेवले होते. त्याचप्रमाणे वाहनाची विमा पॉलिसी देखील मूळ मालकाच्या नावावर काढण्यात आलेली होती. सदर वाहनाचा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान आरोपीकडून संबंधित विमा पॉलिसी जप्त केली. पोलिसांनी या पॉलिसीबाबत विमा कंपनीकडे चौकशी केली असता सदर पॉलिसी बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीच्या वतीने जामीन अर्जावर युक्तिवाद करताना ॲड. शिरीष पाटील यांनी न्यायालयास नमूद केले की, सदर गुन्ह्यातील सर्व पुरावे हे केवळ कागदोपत्री स्वरूपाचे असून ते आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपीने सदर विमा पॉलिसीचा कोणत्याही अन्य ठिकाणी गैरवापर केलेला नाही. आरोपी हा अशिक्षित असून विमा पॉलिसी संदर्भात त्याचीच फसवणूक झालेली आहे, तसेच,आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, असेही युक्तिवादात मांडण्यात आले. सदर प्रकरणात आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद विचारात घेऊन  न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तीसह जामीन मंजूर करत त्याची मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. शिरीष पाटील यांच्यासह ॲड. अमोल जगताप व ॲड. अभिषेक पाटील यांनी कामकाज पाहिले.

Share

Other News

ताज्या बातम्या