कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाचे सहा खेळाडूंची बीड येथे होणाऱ्या 61 व्या पुरूष - महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली.
दिनांक १८ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत बीड येथे होणाऱ्या ६१व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी राणाप्रताप मंडळाच्या ६ खेळाडूंची सांगली जिल्हा संघात निवड झाली आहे.यात पुरूष गटात अक्षय मासाळ, आयुष लाड, ओम पाटील व बिरू बंगारी या चौघांची तर महिला गटात दीक्षा पाटील व रेश्मा मुजावर या दोघांची ची निवड झाली आहे.
______________________
*दहा दिवसाच्या कालावधीत मंडळाच्या चौदा खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड*
अहिल्यानगर येथे झालेल्या ५१ व्या कुमारी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी राणाप्रताप मंडळाच्या तीन खेळाडूंची निवड झाली होती.तसेच दिनांक 4 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत नांदेड येथे झालेल्या अश्वमेध राज्यस्तरीय विद्यापीठ खो खो स्पर्धेसाठी मंडळाच्या पाच खेळाडूंची निवड झाली होती. तर आता बीड येथे होणाऱ्या पुरूष - महिला राज्य अजिंक्यपद खो - खो स्पर्धेसाठी राणाप्रताप मंडळाच्या सहा खेळाडूंची निवड झाली आहे. गेल्या दहा दिवसात राणाप्रताप मंडळाचे चौदा खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
______________________
निवड झालेल्या खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, अजित पाटील,रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळत आहे.