नांदेड जिल्ह्यातील मोबाईल मिसिंग मधील 30,49,000/- रुपयाचे 202 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत सायबर शाखेची कामगिरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/12/2025 8:12 PM

 नांदेड :- जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वसंत सप्रे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन नांदेड, स्थागुशा आणि जिल्ह्यातील सर्व पोस्टे यांचे पथक तयार करुन मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती.

सदर मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एकूण 202 मोबाईल किंमत 30,49,000/-रुपयाचे हस्तगत करण्यात आले, त्या सर्व मोबाईलचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकांची माहिती नांदेड पोलीस दलाचे "Nanded Police" या Facebook Page वर टाकण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक भोकर डॉ. अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती डॉ. आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन सायबर पो.उप.नि. एम.बी. चव्हाण, पोलीस अमलदार राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, महेश बडगु, मपोकॉ कांचन कसबे, रेश्मा पठाण, शुभांगी जाधव, दावीद पिडगे, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दिपक राठोड, साई शेंडगे यांनी पाडली आहे.

मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी CEIR पोर्टलवर गहाळ मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. सदर कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या