वणी पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा..

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 29/12/2025 7:12 PM

वणी-प्रतिनिधी इरफान शेख- वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका सौ.अश्लेषा जेनेकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी व श्री.सतिश बाविस्कर उपस्थित होते.  याप्रसंगी विविध विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली,  समस्या सोडविण्याची क्षमतेचे रुजवणूक करण्याकरिता व 'I m Samarth' ही गणिताची प्रतियोगिता घेण्यात आली, विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारांना वाव देत गणित प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री.सतिश बाविस्कर  यांनी गणितज्ञ रामानुजन यांचे गणित क्षेत्रातील योगदानाचे महत्व विषद करीत हा दिवस संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस असल्याचे आपल्या मार्गदर्शनात सांगीतले. तसेच श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाशजी चचडा तसेच सदस्य श्री. विक्रांतजी चचडा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन कु.आफरीन अंसारी व कु.पलक रेवती यांनी तर आभार प्रदर्शन कु.जिगीषा कुडमेथे हिने मानले.यशस्वितेसाठी गणित शिक्षिका कु. तेजस्विनी झाडे, कु. प्रगती वरहाटे, कु. चेतना लोडे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या