नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र भारतीय जनता पार्टी कडून युतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता
कार्यकर्त्यांच्या भावना आणि नाशिक शहराच्या हिताचा सखोल विचार करून आम्ही एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इलेक्टिव मेरिट’च्या तत्त्वावर सक्षम, प्रामाणिक व जनतेशी थेट जोडलेले उमेदवार देत नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय व प्रभावी कार्यवाही करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
जनता आणि कार्यकर्त्यांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यानी
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर पत्रकार बांधवांशी संवाद साधतांनी सांगितले
याप्रसंगी शिवसेना पक्षाचे नेते माननीय विजय करंजकर माजी खासदार हेमंत गोडसे अजय बोरस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ माजी खासदार समीर भुजबळ आमदार खोसकर साहेब नेते उपस्थित होते.