नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/12/2025 7:52 PM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पुढे नमुद यात्रा व सणाच्या दिवशी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.  

मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स, शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन तर शुक्रवार 18 सप्टेंबर 2026 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. 

या तीन दिवसाच्या स्थानिक सुट्या नांदेड जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार, उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. तसेच हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू होणार नाही, असेही अधिसुचनेत नमूद केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या