सांगली : महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन च्या वतीने १६ वर्षाखालील इनविटेशन टूर्नामेंट स्पर्धा होणार आहेत.
सदर स्पर्धे साठी सांगली जिल्ह्याचा संघ निवड चाचणी घेऊन निवडण्यात येणार असून सदर संघ हा सांगली जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सदर निवड चाचणी ही शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड वर होणार आहे, तरी जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान सांगली जिल्हा क्रिकेटअसोसिएशनचे चेअरमन संजयजी बजाज यांनी केले आहे.