ज्येष्ठांचा सर्वत्र सन्मान व्हावा...... माजी आमदार नानासाहेब बोरस्ते.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 14/04/2026 5:59 AM

ज्येष्ठांचा सर्वत्र सन्मान व्हावा...... माजी आमदार नानासाहेब बोरस्ते.                    सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जेष्ठ कामगार बंधूंच्या कार्याचा अभिमान असून ते करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा सर्वत्र सन्मान व्हायला पाहिजे असे प्रतिपादन लेखक, कवी व शिक्षक संघाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले.    भगूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दीन, सभासद बंधू वाढदिवस व सभासद बंधूंच्या ५०वर्षाच्या वैवाहिक कार्याचा सत्कार समारंभ जेष्ठ नागरिक संघ सभागृह भगूर येथे नुकताच संपन्न झाला, प्रमुख अतिथी म्हणून आमदार नानासाहेब बोरस्ते हे होते, समारंभ अध्यक्ष स्थानी भगूर परिसर संघ अध्यक्ष मा. खंडेराव नाना गायकवाड हे होते, तसेच फेस्कॉम चे विजय राऊत, हे अतिथी म्हणून उपस्थित होते, प्रारंभी स्वातंत्र्य देवी, छत्रपती शिवाजी महाराज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नानासाहेब बोरस्ते, माजी उपजिल्हाधिकारी काशिनाथ उबाळे व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रास्ताविक दादासाहेब देशमुख यांनी केले. या वेळी सभासद सर्वश्री शंकर बोराडे, सुखदेव वाघमारे, मारुती आहेर, कन्हैया तेलंगी, सुभाष सोनवणे, वसंत सांगळे, राम कांबळे, विठ्ठल ढेरिंगे, अशोक घाटकर यांचा वाढदिवस संपन्न झाला. तसेच विवाहास ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या जोडप्याचा सहपत्निक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विजय राऊत, नानासाहेब बोरस्ते यांचे प्रासंगिक मनोगते झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मारुती कोरडे, अंबादास मुठाळ त्र्यंबक करंजकर, अंबादास पाटील, बेदरकर सर, नरेश जोशी, अंबादास पाटिल, वसंतराव खैरनार, रतन लोट, अनंतराव कापसे यांनी संयोजन केले, कार्यक्रमास सौ. कौसल्या मुलाने,तानाजीराव गायधनी, श्रीराम कातकाडे.  आदींनी परिश्रम घेतले, सूत्रसंचलन प्रशांत कापसे यांनी तर आभार, प्रदर्शन वसंतराव खैरनार सर यांनी मानले. कार्यक्रमास असंख्य जेष्ठ नागरिक, सत्कारार्थी, आदी मनपूर्वक आभार आभार जेष्ठ नागरिक  बंधू, भगिनी उपस्थित होते, आभार खैरनार सर यानी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या