प्रति
मा.नाम.हसन मुश्रीफ साहेब
वैद्यकीय शिक्षण संशोधन मंत्री महाराष्ट्र राज्य
विषय :- पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील सर्वोपचार रुग्णालय सांगली येथील विविध समस्या बाबत
महोदय
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांच्या नावाने रुग्णालय आहे गेले कित्येक वर्षांपासून विविध नवीन इमारती तयार होत आहेत मात्र त्याचबरोबर अत्याधुनिक मशनरी पण आलेले आहेत तरीसुद्धा अजून विविध समस्या भेडसावत आहेत त्याबाबत आम्ही आपणास निवेदन करत आहोत
1)एक्स-रे मशीन जुनी झाली आहेत. एक्स-रे साठी खूप पेशंट असतात.
नवीन अद्यावत एक्स-रे मशीन बसवणे.
त्यासाठी टेक्निशियन वाढवणे
2)सिव्हिल हॉस्पिटल परिसर स्वच्छतेसाठी अजून चांगल्या पद्धतीने करण्यात आली पाहिजे
3)सिव्हिल हॉस्पिटल परिसर सुशोभीकरण करणे मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या केल्या जात असून त्या पद्धतीने आवार मात्र दुरावस्थेत झाला अंतर्गत रस्ते, विविध औषधी वनस्पती यांची लागवड, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रशस्त उद्यान व इतर अनुषंगिक कामे
4)जैविक कचऱ्यासाठी बंदिस्त जागा हवी. कचरा उघड्यावरच साठवला जातो त्यामुळे रुग्णायल परिसरात रोग राई वाढण्याची शक्यता आहे
5) शिकाऊ डॉक्टर यांसाठी असलेले वसतिगृह अद्यावत करणे.आताचे वस्तीगृह दूरवस्थेत आहे
6)सांगली शवागर बंद अवस्थेत आहे. बॉडी सांगली शहरातील नातेवाईकांना मिरजला घेऊन जायला लागते
सांगली येथील शवागर अद्यावत करणे आवश्यक आहे
7) स्थानिक पातळीवर वैद्यकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांची समिती स्थापन करण्यात आली पाहिजे
असे बरेचसे प्रश्न आहेत त्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी.
सतीश साखळकर शंभूराज काटकर रवींद्र वळवडे नितीन चव्हाण डॉ संजय पाटील प्रशांत भोसले युसुफ उर्फ लालु मिस्त्री राहुल पाटील योगेश पाटील