सांगलीकर कंटाळले प्रशासन दिरंगाईला, स्फूर्ती चौक रस्ता कामासाठी लोकहित मंच आक्रमक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/02/2026 10:19 AM


​सांगली दि ८ 
​सांगली शहरातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा स्फूर्ती चौक ते आलदर चौक या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. प्रशासकीय उदासीनता आणि विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी 'लोकहित मंच' आता जनआंदोलनाच्या तयारीत आहे.
​या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खालील प्रमुख मुद्दे समोर येत आहेत:
​विभागांमधील टोलवाटोलवी: ड्रेनेज खोदाई, महावितरणच्या खांबांचे स्थलांतर आणि महापालिकेची आडमुठी भूमिका यामुळे कामाला खीळ बसली आहे. प्रत्येक विभाग जबाबदारी झटकून दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे.
​निधी असूनही काम ठप्प: आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर होऊन तीन वर्षे उलटली आहेत. तरीही केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत.
​नागरिकांच्या जीविताशी खेळ: रस्ता पूर्णपणे उखडलेला असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
​प्रशासनाचा ढिम्मपणा: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांच्यातील पत्रव्यवहार फक्त फाईलींपुरता मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर कामाचा पत्ता नाही.

​आपला नम्र,
​मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या